महाराष्ट्र - स्थान,स्थापना,विभाग

  • महाराष्ट्र राज्याची स्थापना १ मे १९६० रोजी झाली.
  • महाराष्ट्राचे कोकण, देश, मराठवाडा, विदर्भ हे चार प्रादेशिक विभाग आहेत.
  • महाराष्ट्राचे स्थान पश्चिम भारतात असून अक्षांश १५.८ उत्तर ते २२.१ उत्तर, तर रेखांश ७२.६ पूर्व तर ८०.९ पूर्व आहे.
  • महाराष्ट्राच्या पश्चिमेस अरबी समुद्र, वायव्येस - दादरा नगर हवेली, व गुजरात, उत्तरेस - मध्य प्रदेश, पूर्वेस - छत्तीसगड, आग्नेयेस - आंध्रप्रदेश, आणि दक्षिणेस - कर्नाटक व गोवा आहेत.


महाराष्ट्र - प्रशासकीय विभाग - जिल्हे [६]
१] कोकण विभाग - मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधदुर्ग
२] नाशिक विभाग - नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर
३] पुणे विभाग - पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा
४] औरंगाबाद विभाग - औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, उस्मानाबाद, लातूर
५] अमरावती विभाग - अमरावती, यवतमाळ, बुलढाणा, अकोला, वाशीम
६] नागपूर विभाग - नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली

महाराष्ट्र प्राकृतिक
  • महाराष्ट्रच्या पश्चिमेस अरबी समुद्र पूर्वेस सह्यांद्री पर्वत, उत्तरेस सातपुडा पर्वत, आहे.
  • महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई आहे हे अहमदनगर व नाशिक या जिल्यात असून त्याची उंची १६४६ मी आहे.
  • महाराष्ट्रात सुमारे ९०% भूभाग हा बेसॉल्ट म्हणजेच अग्नीजन्य खडकांनी बनलेला आहे.
  • महाराष्ट्रात महाबळेश्वर, तोरणमाळ, चिखलदरा ही थंड हवेची ठिकाणे आहेत.
  • महाराष्ट्रात काळी कापसाची रेगूर मृदा ही सर्वात जास्त असून तिची सुपीकता अधिक आहे.


महाराष्ट्रातील धरणेधरण - नदी - जिल्हा
१] भंडारदरा - प्रवरा - अहमदनगर
२] कोयना - कोयना - सातारा
३] भाटघर - येळवंडी - पुणे
४] धोम - कृष्णा - सातारा
५] पानशेत - अंबी - पुणे
६] जायकवाडी - गोदावरी - औरंगाबाद
७] खडकवासला - मुठा - पुणे
८] बिंदुसरा - बिंदुसरा - बीड
९] मुळशी - मुळा - पुणे
१०] तानसा - तानसा - ठाणे
११] गंगापूर - गोदावरी - नाशिक
१२] मोडकसागर - वैतरणा - ठाणे
१३] चाणकपूर - गिरणा - नाशिक
१४] तोतलाडोह - पेंच - नागपूर
१५] राधानगरी - भोगावती - कोल्हापूर
१६] दारणा - दारणा - नाशिक
१७] येलदरी - पूर्णा - हिंगोली
१८] सिद्धेश्वर - पूर्णा - हिंगोली
१९] उजनी - भीमा - सोलापूर
२०] वीर - नीरा - पुणे